उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबादच्या कार्य तत्पर जिल्हाधिकारी सौ. दिपा मुधोळ मुंडे यांच्या संकल्पेतून  गरजू  नागरिकांना वैद्यकिय सेवेचा लाभ घेता यावा या उद्देशाने सकल मुस्लीम समाज उस्मानाबादच्या वतीने शहरातील विविध भागात मोहल्ला क्लिनिकची संकल्पना राबविण्यात आली आहे.  दि. 7 रोजी संध्याकाळी 5 वाजता मिल्ली काॅलणी येथील सफा मस्जिद जवळ मोहल्ला क्लिनिक शाखा 5  चे उद्घाटन  नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमूख पाहुणे नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे  यांची  उपस्थित होती.  हा उद्घाटन सोहळा सर्व नगरसेवक, प्रतिष्ठीत नागरिक यांच्या साक्षीने  पार पडला. कार्यक्रमाचे  आयोजक मौलाना अय्युब कासमी,मुफ्ती रहेमतुल्ला ,मौलाना अहमद यांनी प्रमुखाची  स्वागत केले. प्रास्ताविक मसूद शेख यांनी केले. आभार  मुफ्ती रहेमतुल्ला यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जाफर खान साहेब,  मोईनोद्दीन पठाण, खादर खान खलीफा कुरैशी, प्रदीप घोणे, बाबा मुवार, खलील पठान, मन्नान काझी, असद पठान, शहजाद काजी, सरफराज काजी असिफ मुजावर,  शाह सर  व परिसरातील प्रतिष्ठित लोक उपस्थित होते.
x
 
Top