उस्मानाबाद / प्रतिनिधी-
श्री बाल हनुमान गणेश मंडळ गवळी गल्ली येथील  मानाचा गणपती  श्री ची पूजा विधि माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ , जीवनराव गोरे, कोरूना योद्धा नवी मुंबई येथील मिलेनियम हॉस्पिटल चे संस्थापक व प्रमुख अस्थिरोग तज्ञ डॉक्टर व्यंकटेश हंचाटे, स्वाधार मतिमंद मुलींचेव अनाथ  मुलींची निवासी शाळेचे संस्थापक शहाजी चव्हाण यांच्या शुभास्ते संपन्न झाली .
यावेळी श्रीची पूजा विधि शास्त्रोक्त मंत्र उच्चार व विधिवत पूजा काशिनाथ दिवटे यांच्या सुरेख आवाजात टाळ व टाळ्यांच्या गजरात आनंदी व प्रसन्नतेचा वातावरणात संपन्न संपन्न झाली. मंडळाच्यावतीने श्रीयुत जीवनराव गोरे ,  डॉक्टर वेंकटेश हंचाटे , व शहाजी चव्हाण या सर्वांचा सत्कार फेटा शेला श्री ची प्रतिमा देऊन राजकुमार  दिवटे , प्राध्यापक गजानन गवळी, डॉक्टर अजित नायगावकर, विद्या साखरे अनिल जावळे संजय पाळणे यांच्या हस्ते करण्यात आला सत्कारास उत्तर देताना शहाजी चव्हाण म्हणाले मंडळ मंडळाचे कार्यकर्ते यांनी मतिमंद मुलींची निवासी शाळा सुरू केल्यापासून ते आजतागायत या मतिमंद मुलींना पूजा विधीमध्ये सहभागी करून सामान्य माणसासारखं आनंद व प्रसन्नता निर्माण करण्याचे कार्य व मंडळाकडून भेट वस्तु जीवनोपयोगी वस्तू देण्यात आली. यापेक्षा वस्तू किंवा पैसा गौण मानले गेले आहे . आपण आमच्या कार्याला प्रेरणा व प्रोत्साहन दिली आहे.
 मंडळाचे कार्य  अनेक प्रसंगाने व  निमित्ताने पाहिले आहे . मंडळात  चार वर्षापासून ते 75 वर्षे वयापर्यंत मोठा सहभाग दिसून आला आहे. मंडळाचे वैशिष्ट बारा बारा तास लेझीम खेळून दम कौशल्य व सातत्य दिसून आले . आजही लहान-मोठा हा भेद नसून विविध जातीने धर्माने मंडळ 56 वर्ष कार्य करीत आहे. सातत्य कार्य करणे हेच आदर्श मंडळ ठरते.   डॉक्टर वेंकटेश हंचाटे यांनी नवी मुंबई येथे मिलेनियम हॉस्पिटलची निर्मिती करून अत्यंत श्री व सौ . पंचवीस वर्षापासून सेवा रुग्णांच्या साठी देत आहेत  कोरूना चे पेशंट यांच्यावरही खास वार्ड त निर्माण करून रुग्णांना घरी पाठविले . पैशापेक्षा मानवतेच्या सेवेला प्रथम प्राधान्य देऊन मुंबईत स्वातंत्र धाडसी व सर्व दक्षता घेऊन कार्यरत आहेत यांनी या सत्कारास माझा माझ्या घरचा हा सत्कार आहे तोच इतर कुठल्याही पेक्षा श्रेष्ठ आहे. डॉक्टर हंचाटे व त्यांचा पूर्ण परिवार मंडळाच्या गणेशोत्सवामध्ये मोठा सहभाग असतो मुंबईतून प्रतिष्ठापना व  विसर्जन  दोन्ही मिरवणुकीमध्ये  सहभागी होऊन यशस्वी करणारे हे कुटुंब आहे . जीवनराव गोरे यांनी आपल्या मनोगतातून मंडळाचे कार्य अनेक वर्षापासून मी पहात आलोय यावर्षी चे कार्य वेगळे आहे आणि आज करीत असलेले कार्य विश्वातील मानवावर आलेले मोठे महामारी चे संकट आहे . अनेक जीव चालले पाहून माणसाचा जीव वाचला पाहिजे विश्वाची धर्म आहे . मंडळ कोरोना या विषयी अत्यंत जागरूकतेने कार्य करीत असलेले पाहून मास्क वापर असेल ,   गोळ्या   प्लाजमा करण्यासाठी झटणारे, पर्यावरण यांचे संरक्षण मातीचा गणपती, रक्तदान व अन्नदान उत्सवात प्राधान्य देऊन केला जातो. शासनाचे नियम कोरूना चे असणारे जागरुकतेने चे लक्षण याचा विचार करून, गर्दी टाळून उत्सव - पूजा विधि केला जातो . सर्वांना समावेश करून उत्सवाची परंपरा आनंद   जपणूक करीत आहात सर्वांनाआपल्याला धन्यवाद. माणसाला वाचविणे व कोरोना पासून सावध राहणे हीच आज गरज आहे.  मंडळाच्यावतीने हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी व सर्व लहानथोर कार्यकर्ते इत्यादी परिश्रम घेत आहेत या कार्यक्रमाचे आभार राजकुमार दिवटे व सूत्रसंचालन भालचंद्र   यांनी केले आहे गणेश उत्सव साजरा करूया - कोरोना ला पळवू या . अशा जय जय कार करून , सर्वांना तीर्थप्रसाद वाटप करून समारोप झाला.
 
Top