उस्मानाबाद / प्रतिनिधी-
शहरातील गवळी गल्लीतील श्री बाल हनुमान गणेश मंडळ  मानाचा गणपती श्री ची पूजा विधि उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय हॉलीबॉल खेळाडू व शिवछत्रपती पुरस्करर्ते, गुणवंत कामगार, आदर्श शिक्षक, क्रीडाशिक्षक व प्रतिष्ठित व्यापारी यांच्या शुभ हस्ते करून क्रीडा दिन हॉकीपटू ध्यानचंद यांचे जगाच्या पाठीवरील स्थान यांच्या स्मृतीस अभिवादन करून करण्यात आले
 शिवछत्रपती पुरस्कार राजकुमार दिवटे रवींद्र जानगवळी, अंकुश पाटील, काशिनाथ दिवटे, नरसिंग साखरे, मनमत पाळणे, प्राध्यापक गजानन गवळी, कुस्तीगीर वैभव अंजीखाने, क्रीडाशिक्षक दत्ताजी वाडकर ,प्रतिष्ठित व्यापारी श्री दिनेश आडवाणी परिवार, विद्यापीठ व शालेय स्तरावर राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंचा पूजाविधीमध्ये मोठा सहभाग कोरूना चे सर्व नियम व सुरक्षित अंतर ठेवून करण्यात आली. स्वर्गीय मटलामला आडवाणी यांनी दरवर्षी श्री च्या पूजे विधी व प्रसाद आणून देण्याची प्रथा चालू केलेली दिनेश आडवाणी यांनी परंपरा चालू ठेवली श्री ची पूजा विधि शास्त्रोक्त मंत्र उच्चारण विधीवत काशिनाथ दिवटे., डॉक्टर नायगावकर विद्या साखरे यांच्या सुरेख  आवाजात संपन्न झाली . 
आनंदी व प्रसन्नतेचे वातावरण निर्माण झाले होते. छोटू तिर्थकर यांच्या घंटानाद ,भक्तांच्या टाळ व टाळ्यांच्या आवाजात आरती म्हणण्यात दंग झाले होते.राष्ट्रीय व राज्य पातळीवरील विविध खेळातील या खेळाडूंचा क्रीडा शिक्षकांचा व प्रतिष्ठित व्यापारी यांचा  सन्मान मंडळाचा  शेला, टोपी व श्री ची प्रतिमा देऊन करण्यात आला. मुझेक्रीडामिल क्रीडा, वरून साळुंके .,राहुल गवळी, उपाध्ये केदार क्रीडासंजय पाळणे -सागर ,कुणाल- श्रीकांत  दिवटे ,आप्पा गवळी, तीर्थकर बंधू, अतुल ढोकर यांच्या शुभास्ते करण्यात  येऊन मेजरध्यानचंद हॉकीपटूचा जय जय कार करून, कोरोना पळवून लावू, गणपती बाप्पा मोरया या जयघोषात संपन्न झाली. क्रीडा दिनाचे महत्व व हॉकीचे जादूगार जगाच्या पाठीवर भारताचे नाव उज्ज्वल करणारे ध्यानचंद यांच्या बद्दल माहिती व प्रतिकूल परिस्थितीतून खेळातून अनुकूलता निर्माण करणारे एकमेव खेळाडू म्हणून देशाचे व आपले नाव लौकिक वाढविणारे ठरले. तीर्थप्रसाद वाटप करून  कोरोनाच्या या महामारी पासून सावध राहणे सुरक्षित  रहाणे जनजागृती व संकल्प करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार भालचंद्र हुच्चे यांनी केले.
 
Top