उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जिल्ह्यातील कोरोना विषाणु (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीसाठी तालुकानिहाय संपर्क अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत . या आदेशामध्ये अंशतः बदल करुन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी परंडा तालुक्यासाठी श्री. सचिन गिरी, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.), जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
वरीलप्रमाणे नियुक्त संपर्क अधिकारी यांनी खालीलप्रमाणे कामकाज करावे.
कोविड-19 चे प्रतिबंधासाठी भारत सरकार, महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासनाने वेळावेळी दिलेल्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.
कोविड-19 चे प्रतिबंधासाठी वेळावेळी देण्यात आलेल्या आदेशांची पोलीस, आरोग्य व इतर यंत्रणांच्या मदतीने प्रभावीपणे अंमलबजावणी व त्याअनुषंगाने आवश्यक ती नियंत्रणात्मक कार्यवाही करावी.
प्रतिबंधित क्षेत्रा (CONTAINMENT ZONE) मध्ये कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी व कडक अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी. कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीच्या शोध घेणे (Contact Tracing) व त्यांना संस्थात्मक विलगीकरणामध्ये (Institutional Quarantine), अलगीकरणामध्ये (Isolation) ठेवणे, संशयित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणामध्ये (Institutional Quarantine), अलगीकरणामध्ये (Isolation) ठेवणे इ.कार्यवाही प्रभावीपणे करण्यासाठी पोलीस,आरोग्य व इतर यंत्रणांमध्ये समन्वय साधणे. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी वेळावेळी दिलेल्या आदेशांनुसार आवश्यक कार्यवाही करणे. या आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.