उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव सुरु झाल्याने  माहे मार्च-2020 पासून तालुकास्तरीय शिबीर कार्यालयामधील कामकाज बंद ठेवण्यात आले होते. तथापि जिल्ह्यातील तालुकास्तरीय शिबीर कार्यालयाचे कामकाज सुरु करण्याबाबत परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी निर्देश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने माहे सप्टेंबर ते डिसेंबर 2020 या कालावधीसाठी तालुकास्तरीय शिबीर कार्यालयाचा दौरा कार्यक्रम वेळापत्रकानुसार आयोजित केला आहे.
 कोवीड-19 पार्श्वभूमीवर शिबीर कार्यालयाच्या ठिकाणी नवीन वाहन नोंदणी, शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्की अनुज्ञप्ती चाचणी इ. कामकाज पार पाडण्यात येणार आहे.
तसेच शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी ही ऑनलाईन पध्दतीने टॅबव्दारे घेण्यात येईल व प्रत्येक चाचणीनंतर टॅब सॅनिटाईज करण्यात येईल. शिबीर कार्यालयात येणाऱ्या अर्जदारांनी मास्क, हातमोजे व सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य असून दोन अर्जदारांमध्ये किमान सहा फुटाचे अंतर ठेवावे लागेल. त्याबाबतच्या सर्व सूचना मोटार वाहन निरीक्षक यांना देण्यात आलेल्या आहेत.जिल्ह्यातील संबंधित तालुक्यातील सर्व वाहनधारकांनी कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर मुख्यालयाच्या ठिकाणी गर्दी न करता वेळापत्रकानुसार शिकाऊ, पक्की अनुज्ञप्ती व नवीन वाहन नोंदणीसंबंधीच्या कामकाजाचा लाभ घ्यावा, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
 
Top