उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी कोरोना विषाणू (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तयार करण्यात आलेले प्रतिबंधित क्षेत्रा (Containment Zone) ची माहिती संकलित करणे व त्याअनुषंगाने अन्य कामकाजासाठी श्रीमती शुभांगी आंधळे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद यांची  नियुक्ती केली आहे.
वरीलप्रमाणे नियुक्त अधिकारी यांनी खालीलप्रमाणे कामकाज करावे.
कोविड-19 चे प्रतिबंधासाठी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये संबंधित Incident Commander तथा उपविभागीय अधिकारी यांनी जाहीर केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांची (Containment Zones) माहिती नियमितपणे संकलित करणे व जिल्ह्यातील एकूण प्रतिबंधित क्षेत्र (Total Containment Zones) व चालू असलेले प्रतिबंधित क्षेत्र (Active Containment Zones)    ची यादी अद्यावत करणे.
कोविड-19 चे प्रतिबंधासाठी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये संबंधित Incident Commander तथा उपविभागीय अधिकारी यांनी जाहीर केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांचा (Containment Zones) आढावा घेऊन अनावश्यक प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zones) तसेच मुदत संपलेले प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zones) रद्द करणे.
कोविड-19 चे प्रतिबंधासाठी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये संबंधित Incident Commander तथा उपविभागीय अधिकारी यांनी जाहीर केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांची (Containment Zones) माहिती डॅशबोर्डवर नियमितपणे भरली जात असलेबाबत, अद्यावत ठेवली जात असलेबाबत नियंत्रण, पर्यवेक्षण व समन्वय करणे.
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी वेळावेळी दिलेल्या आदेशांनुसार आवश्यक कार्यवाही करणे.या आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.

 
Top