उस्मानाबाद / प्रतिनिधी-
खरीप हंगामामध्ये 1 एप्रिल 2020 ते 31 जुलै 2020 या कालावधीमध्ये  प्रत्येक जिल्ह्यातील युरिया खरेदीरांपैकी सर्वात जास्त युरिया खत खरेदी केलेल्या पहिल्या 20 युरिया खरेदीदारांची तपासणी करण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिलेल्या होत्या. त्याअनुषंगाने www.urvarak.nic.in या संकेतस्थळावरील नोंदीप्रमाणे जिल्ह्यातील सर्वात जास्त 20 युरिया खरेदीदारांची तपासणी संबधित तालुक्यातील कृषि अधिकारी यांच्याकडून करण्यात येवून अहवाल प्राप्त झालेला होता.
 त्याअनुषंगाने दिनांक 19 ऑगस्ट, 2020 रोजी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे संबधित खत परवानाधारक कृषि सेवा केंद्राची सुनावणी घेण्यात आली. सुनावणी अंती झालेल्या आदेशान्वये पुढीलप्रमाणे परवाने निलंबित करण्यात आले.
निलंबित करण्यात आलेल्या कृषि सेवा केंद्रामध्ये 1) मे.कृषि वस्तू भांडार शाखा नं.2. उस्मानाबाद २) कृषि सम्राट कृषि सेवा केंद्र,चिखली चौरस्ता ता.उस्मानाबाद ३) सचिन ॲग्रो एजन्सीज भूम ४) संघवी एंटरप्रायजेस परंडा ५) श्री समर्थ अॅग्रो एजन्सीज,परंडा ६) सप्तशृंगी कृषि सेवा केंद्र, अणदूर ता.तुळजापूर ७) माऊली कृषि सेवा केंद्र, उमरगा चिवरी ता.तुळजापूर ८) राज कृषि सेवा केंद्र, अणदूर ता.तुळजापूर ९) जय मल्हार कृषि सेवा केंद्र, जळकोट ता.तुळजापूर १०) ईश्वर कृषि सेवा केंद्र, जेवळी ता.लोहारा ११) महाराष्ट कृषि सेवा केंद्र, माकणी ता.लोहारा १२) बालाजी कृषि सेवा केंद्र, लोहारा १३) साई कृषि सेवा केंद्र, लोहारा समावेश आहे.
हे आदेश परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद यांनी दिलेले असून संबधित परवानाधारकास या आदेशाच्या निर्णयाविरुध्द अपील करावयाचे असल्यास विभागीय कृषि सहसंचालक  लातूर विभाग, लातूर यांच्याकडे आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आत अपील करता येईल.
या सुनावणीस श्री. यु. आर. घाटगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, श्री. टी. जी. चिमणशेटे, कृषि विकास अधिकारी, जि. प. उस्मानाबाद, श्री. सी. जी. जाधव, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक उस्मानाबाद, श्री. व्ही. एस. निरडे, मोहीम अधिकारी जि. प. उस्मानाबाद, संबंधित पं. स. कृषि अधिकारी व कृषी सेवा केंद्राचे प्रोपरायटर यांची उपस्थिती होती. 
 जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्र धारकांनी केंद्र शासन व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशाप्रमाणे तसेच खरेदीदार शेतकऱ्यांचे आधारकार्ड ई-पॉस मशीन वर नोंद करुन खताची विक्री करावी. कोणत्याही परस्थितीमध्ये जास्तीचा युरीया अथवा जादा दराने खताची विक्री होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यु. आर. घाटगे यांनी केले आहे.

 
Top