उस्मानाबाद / प्रतिनिधी-
पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर सोलापूर विदयापीठ परिसरात राजामाता अहिल्याबाई होळकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी खा.सुप्रिया सुळे यांची भेट कु.सक्षणा सलगर यांनी घेऊन निवेदन देऊन केली.
राजमाता,राष्ट्रमाता लोकमाता लोककल्याणकारी महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंत नद्या,तलाव,पूल,विहिर,धर्मशाळा बांधल्ता भारतातल्या सर्व तीर्थक्षेञातील मंदिराचा जीर्णेदार तसेच धार्मिक तीर्थस्थळांना देणग्या दिल्या याची खूप मोठी यादी आहे तसेच माळवा राज्य सुख समृध्द केले भिल्ल,गौंड लोकांना शेतकरी बनविले विधवा महिलांना संपत्तीत वाटा मिळावा तसेच मुल नसेल तर दत्तक घेता येते यावे यासाठी त्यांनी प्रयत्न केला.
अठराव्या शतकात महिला सक्षमीकरण करण्यासाठी अहोराञ परिश्रम केले आहिल्यादेवी पुरोगामी दृष्टी किती पुढची होती यावरून दिसून येतो लोककल्याण कारी महाराणी आहिल्याबाई होळकर या हयातीतच असताना प्रजेने पुण्यश्लोक या पदवीने दिली दानशुराच्या बाबतीत त्यांच्याइतका दानशूर राजा किंवा राणी इतिहासात सापडत नाही आदर्श राज्यकर्ता,पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई थोर राजकारणीही होत्या सन 1772 मध्ये त्यांनी पेशव्यांना इग्रंज हा शञू सर्वात भयंकर आहे वेळीच सावध रहा असा इशारा दिसला यातून त्यांचा उच्च दर्जा दिसून येत होता हैद्राबादच्या निजाम सरकारने ही थोर राज्यकर्ती आजवर पाहीली नाही असा उल्लेख सापडतो.
राजमाता आहिल्याबाई होळकरांचे विचार येणा-या पिढीने आदर्श घ्यावा त्यांचे आचरण करावे हा देशात त्यांचे कार्य कर्तबगारी सुवर्ण अक्षरांनी लिहावी असे त्यांचा इतिहास आहे त्यांचा आदर्शवत महाराणी लोकल्याणारी न्यायदेवता राजमाता,लोकमाता राष्ट्रमाता,लोककल्याणकारी महाराणी आहिल्यादेवी होळकर या रयतेच्या हितासाठी अहोराञ स्वतःच्या प्रपंचा चा विचार न करता आदर्श राज्यव्यस्था निर्माण केली त्यांचे विचार आत्मसात आचरणात यावेत या उद्देशाने पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर विदयापीठा समोर भव्य पुतळा स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी कु.सक्षणा ताई सलगर यांनी खा.सुप्रिया ताई सुळे यांच्या कडे केली
पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर विदयापीठ सोलापूर एकूण माहविदयलय 118अनुदानित42,एकूण विद्यार्थी 65000,विद्यापीठ विभाग 5,विद्यापीठ विभाग विद्यार्थी 1000 एकूण जमीन 480 एकर आहे.
विदयापीठाच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचत येणारी पिढी त्यांचा आदर्श घेण्यासाठी त्यांचे विद्यापीठ परिसरात भव्य पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी खा.सुप्रिया ताई सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेश अध्यक्षा क.सक्षणा सलगर यांनी केली...