तेर / प्रतिनीधी
महाराष्ट्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी बांधकामाच्या व्याख्येत समाविष्ट करण्यात आलेल्या 21 बांधकाम व्यवसायांशी निगडीत व्यवसायात काम करणाऱ्या, वय वर्ष 18 पूर्ण ते वय वर्षे 59 पूर्ण, वय वर्ष 60 च्या आतील कामगारांची नोंदणी केली असून त्यामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील 32427 क्षेत्रिय कामगाराची या कार्यालयात झालेली नोंदणी आहे.
कोरोना विषाणु महामारीच्या काळात शिवसेना पक्षाच्यावतीने मोठया प्रमाणात जिल्हयातील कामगार या योजनेपासून वंचित होते. शिवसेना पक्षाच्यावतीने जिल्हयातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मजूरांचे फॉर्म भरुन घेणे, माहिती घेणे, फॉर्म जमा करणे यासारखे परिश्रम घेतले. त्यामुळे एकूण नोंदणी झालेल्या कामगारांपैकी 28791 कामगारांच्या बँक खात्यात रु. 14 कोटी 39 लाख 95 हजार एवढी रक्कम शासनाच्यावतीने जमा करण्यात आली आहे अशी माहीती शिवसेना उस्मानाबाद तालुका प्रमुख सतीष सोमाणी यानी दिली.
कोरोना महामारीच्या काळात उस्मानाबाद जिल्हयातील बांधकाम कामगारांना लाभ दिल्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आघाडी सरकारचे आभार मानले आहेत. जिल्हयातील एकूण 28791 मजूरांच्या बँक खात्यात प्रत्येकी 5000 रुपये जमा करण्यात आले असून सदरील रक्कमेपोटी जर कोणतीही अडचण असेल तर जिल्हा शिवसेना कार्यालय, उस्मानाबाद येथे संपर्क साधावा व आणखी काही मजूर कामगार वंचित असल्यास त्यांनी नोंद करावी असे आवाहन उस्मानाबाद तालुका शिवसेना अध्यक्ष सतीश सोमाणी यानी केले आहे.