उस्मानाबाद / प्रतिनिधी-
सामाजिक न्याय भवनच्या धर्तीवर प्रत्येक जिल्हयात महिला व बाल विकास भवन स्थापन करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून या निर्णयानुसार येथील जुन्या जिल्हा परिषदेतील कार्यरत असलेल्या महिला व बाल विकास कार्यालयात महिला व बालविकास भवनचे उदघाटन पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान होम आयसोलेशन (गृह विलगीकरण) या पुस्तिकेचे प्रकाशनही त्यांचे हस्ते करण्यात आले.
प्रारंभी सावित्रीबाई फुले व राजामाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पालकमंत्री गडाख यांनी पुष्पहार अर्पण करून महिला व बालविकास भवनचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्रा.अस्मिता कांबळे, खासदार ओमराजे निबांळकर, आमदार कैलास घाडगे-पाटील, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, जि. प. उपाध्यक्षा धनजंय सावंत, महिला बालकल्याण सभापती रत्नमाला टेकाळे, कृषी सभापती दत्ता साळुके, तहसिलदार गणेश माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (महिला बालकल्याण) बळीराम निपाणीकर आदिसह इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच खाजानगर येथील मदिना चौकात असलेल्या नगर परिषदे शाळेत सुरू करण्यात आलेल्या मोहल्ला क्लिनिकचे उदघाटन पालकमंत्री व मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत येणाऱ्या व उदभवणाऱ्या अडचणी जाणून घेऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी मैनोदीन पठाण,मसुद शेख,नगरसेवक इस्माइल शेख,खलील सय्यद, बीलाल रजवी, डॉ.के.के. बागवान, नगरसेवक बाबा मुजावर, नगरसेवक खलीफा कुरेशी निसार बागवान इंतियाज पटेल,जाफर मौलाना,व बीलाल मौलाना आदिसह मोहल्ला क्लिनिकचे पदाधिकारी व मुस्लीम बांधव उपस्थित होते.तर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसरात वरील मान्यवराच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी विद्यापीठ सिनेट सदस्य संजय निबांळकर,संचालक दत्तात्रय गायकवाड, डॉ.प्रशांत दीक्षीत अदिसह इतर उपस्थित होते.
उमरगा येथील मिनाक्षी मंगल कार्यालयात 100 खाटांचे कोवीड केअर सेंटर चे उदघाटन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव यशवंतराव गडाख यांनी उपजिल्हा रुग्णालय, उमरगा येथील कोविड सेंटर, ईदगाह कोवीड सेंटर येथे भेट दिली व मिनाक्षी मंगल कार्यालय येथे 100 खाटाचे कोवीड -१९ केअर सेंटर चे उदघाटन(दि.14) केले. यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार कैलास बाळासाहेब पाटील, आमदार ज्ञानराज चौघुले, अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवले, कार्यकारी अभियंता अनिल सगर, जिल्हा आरोग्य अधिकारी डाँ. हणमंत वडगावे, उप विभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, वैद्यकीय अधिक्षक डाँ. ए. आर बडे आदि उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री गडाख यांनी सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयात भेट दिली व येथील आरोग्य सोयी सुविधांची पाहणी केली.