उस्मानाबाद / गोविंद पाटील -
एक ऑगस्ट रोजी  मुस्लिम धर्मातील बकरी ईद सण साजरा होणार आहे. त्याअनुंषगाने सोमवार दि. २७ जुलै रोजी रात्री बेंबळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक मुस्तफा शेख यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीस बेंबळी गावातील मौलवी तसेच कुरेशी समाजाचे नागरिक उपस्थित होते. या बैठकीत मुस्लिम बांधवांनी बकरी ईद हा सण साध्या पध्दतीने साजरा करण्याचे ठरले. ईद दिवशी कोठेही गर्दी करू नये,  प्रत्येकांनी शासनाने ठरवुन दिलेल्या नियमाचे पालन करावे आदी विषयावर चर्चा करण्यात आली.
प्रतीवर्षी सर्व मुस्लिम बांधव ईदगाह मैदानावर एकत्रीत येऊन “ ईद उल-अज़हा” नमाज अदा करीत असतात. परंतु या वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व मुस्लिम बांधव घरीच नमाज अदा करावे असे आवाहन पोलिस निरिक्षक मुस्तफा शेख यांनी केले. त्यांनी सांगितले की,  रमजान हा मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना आहे. तो संपल्यानंतर सुमारे ७० दिवसांनंतर बकरी ईद साजरी केली जाते. या दिवशी कुर्बानीला विशेष महत्त्व असतं. जगभरात बकरी ईदचा हा सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो.मुस्लिम बांधवांचा पवित्र बकरी ईद अवघ्या  दोन दिवसावर आला आहे मात्र कोरोनाची पार्श्वभूमी आणि लॉकडाउन असल्याने  मुस्लिम बांधवांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बकरी ईद अत्यंत साधेपनाने साजरा करावा. बकरीईद हा वर्षातील मोठा सण आहे. मुस्लिम धर्मात या सणास विशेष मान्यता आहे. यादीवशी कुरबानी दिली जाते. व गरीबांना अन्नदान केले जाते.  पण यंदा कोरोना विषाणूच्या संसर्गाची भिती सर्वांनसाठीच  भीतीदायक ठरत आहे.  शनिवारी (दि. १ ) ऑगस्ट रोजी बकरी ईद संपन्न होणार आहे .या संकटावर मात करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी शासनाच्या नियमाचे पालन करून ईद साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन पोलिस निरिक्षक मुस्तफा शेख यांनी केले.  या बैठकीस, मैनोद्दीन दर्यांजी सर , शादुल्ला सौदागर, इनायत तुल्ला हाफिसाहब, मुस्तफा सौदागर, आदम शेरीकर, मोहम्मंद कोतवाल अन्य मुस्लिम नागरिक व  बेंबळी पोलिस ठाण्यातील  कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
"बलिदानाची ईद’
ईद उल-अज़हा ही ‘बलिदानाची ईद’ आहे. मुस्लिम मान्यतांनुसार, हजरत इब्राहिम आपले पुत्र हजरत इस्माईल यांना याच दिवशी अल्लाहच्या आदेशावरुन अल्लाहासाठी बलिदान देण्यासाठी जात होते. मात्र अल्लाहने हजरत इस्माइलला जीवनदान दिले. त्यांच त्याग आणि बलिदानाच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो.

 
Top