तेर /प्रतिनिधी-
 जिल्हा नियोजन मंडळामार्फत प्राचीन तगर तेर (ता.उस्मानाबाद)  येथील बृहत विकास आराखडा तयार करून मंजुरी मिळण्याची मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून प्राचीन नगर व आजचे तेर (ता. उस्मानाबाद) या ठिकाणी सुरू झालेले वसाहतीकरण आजपर्यंत सुरू असल्याचे तेथील प्राचीन मंदिरे पुरातत्त्वीय अवशेष प्राचीन वसाहतीचे प्रचुर टेकाडे ,पुराणवस्तु संग्रहालय यावरून दिसून येते. सातवाहन कालखंडात इ.स.  पूर्व दुसरे शतक ते दुसरे शतक आर्थिक राजधानी असणाऱ्या अत्यंत महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून प्राचीन त्याची ख्याती जगविख्यात आहे. पेरिप्लस ऑफ इरिर्थीयन सी या ग्रंथातील प्रवास वर्णनानुसार प्राचीन तेरचा रोमन साम्राज्याशी व्यापार चालत होता .त्यामुळे तेर मध्ये तत्कालीन काळात आर्थिक प्रगतीबरोबर इतर क्षेत्र सर्वांगीन विकास झाल्याचे तत्कालीन पुरावशेष वास्तू यावरून दिसून येते तसेच तेरची आजची ओळख वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संत गोरोबा काका कुंभार यांच्यामुळे होते .आज तेर मध्ये बौद्ध, जैन , शैव,शाक्त ,वैष्णव अशा सर्व धार्मिक संप्रदाय यांच्याशी संबंधित वास्तु असल्याचे दिसून येते. या सर्व बाबींमुळे पुरातत्वीय ,पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे.
 त्या अनुषंगाने तेरमधील महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन असणारे त्रिविक्रम मंदिर ,चैत्यगृह, पांढरीची टेकाडे, तीर्थकुंड, संत गोरोबाकाका व श्री कालेश्वर मंदिर समूह, उत्तरेश्वर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, नरसिंह मंदिर ,जैन मंदिर व इतर पुरातत्वीय दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मंदिरे, वास्तू यांचा एकत्रितपणे पुरातत्वीय शास्त्र संकेतानुसार जतन संवर्धनाचा व पर्यटन वाढीच्या दृष्टीने तज्ञ वास्तुविशारद यांच्याकडून बृहत विकास आराखडा तयार करून घेण्याकरिता व त्यास मंजुरी मिळण्याबाबत ची कार्यवाही सुरु करण्यात यावी अशी मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

 
Top