तुळजापूर /प्रतिनिधी-
तालुक्यातील तामलवाडी येथील बालाजी अमाईन्सकडून उस्मानाबाद जिल्हारुग्णालयास २ हाय-फ्लो ऑक्सिजन थेरपी मशिन भेट देण्यात आल्या. उस्मानाबाद जिल्ह्यात  वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण आणि होणारे मृत्यू यांवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकारी सौ. दीपा मुधोळ मुंडे यांनी बालाजी अमाईन्सकडे हाय-फ्लो ऑक्सिजन मशिनची मागणी केली. त्यांच्या विनंतीस प्रतिसाद देत बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकिय संचालक डी. राम रेड्डी यांनी अवघ्या चोवीस तासाच्या आत २ मशिन्स रुग्णालयास उपलब्ध करून दिले. कोरोनाचे गंभीर रुग्ण ज्यांना श्वसन संबंधी त्रास होत आहे त्यांच्यासाठी हे उपकरण खूप सहाय्यक ठरणार असल्याचे डॉ. सतीश सुरवसे यांनी सांगितले.
बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकिय संचालक डी. राम रेड्डी म्हणाले कि या उपकरणाच्या साहाय्याने ज्यांना श्वसन संबंधी त्रास होत अश्या गंभीर रुग्णांवर उपचार केले जातील परिणामी जिल्ह्यातील होणारे मृत्यूचे प्रमाण घटविण्यास नक्कीच मदत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी बालाजी अमाईन्सचे प्रतिनिधी मारुती सावंत व विनोद चुंगे यांनी जिल्हारुग्णालयाचे डॉ. सतीश सुरवसे, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. सचिन बोडके, सतीश पवार यांच्याकडे हे उपकरण सुपूर्द केले.
 
Top