तेर/प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील कै. रामलिंगप्पा लामतुरे शासकीय वस्तुसंग्रहालयच्या नवीन इमारतीचे बांधकाम गुणवत्तापूर्वक व नियोजित वेळेत होत नसल्याचे निदर्शनास आले आहे .याबाबत योग्य ती   कार्यवाही करावी अशी मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे.
 कै. रामलिंगप्पा लामतुरे शासकीय वस्तुसंग्रहालय तेर ता .उस्मानाबाद येथील  नवीन इमारत बांधकामाचे काम आपल्या विभागामार्फत सुरू असून सदर काम गुणवत्तापूर्वक व नियोजित वेळेत होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत आपण आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही करून सदर अहवाल सादर करावा व काम पूर्ण करण्यासंबंधी कालबद्ध सूचीनुसार कामास गती देऊन हे काम वेळेत पूर्ण होण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी व याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करावा असे निवेदन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे.

 
Top