तुळजापूर/प्रतिनिधी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी  श्री तुळजाभवानी मातेच्या मंदीरात  सोमवती अमावस्या दिनाचे औचित्य साधून  पारंपारिक पद्धतीने मंदीरातील विविध प्राचीन दिव्यांचे  दीप पुजन करण्यात आले.
श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य महंत वाकोजी बुवा यांच्या मठात सोमवारी सायंकाळी रुढी पंरपरेनुसार दीप अमावस्या  दिनाचे औचित्य  साधुन मुख्य महंत वाकोजी बुवा यांच्या हस्ते दिप पंत्यांचे  पुजन करण्यात आले. त्यानंतर श्री तुळजाभवानी मातेच्या प्रक्षाळ पुजे नंतर श्री तुळजाभवानी मातेच्या  मुख्य गर्भगृहातील मुख्य पंच धातुच्या दिव्यांचे पुजन करुन दिप प्रज्वलीत करण्यात आले.यावेळी श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य महंत वाकोजी बुवा यांनी संपुर्ण भारत देशासह, महाराष्ट्रवरच संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगाच संकट टळु दे!   भक्तांच्या घरोघरी प्रसन्नता वाढू दे त्यांना उदंड दिर्घायुष लाभू दे अशी देवीचरणी प्रार्थना केली. 
 
Top