
ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकजी केदार यांच्या आदेशाने महाराष्ट्र महासचिव विनोद भोळे यांनी धनंजय हुंबे यांची उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
ऑल इंडिया पँथर सेना जातीय अत्याचारा विरोधात लढा देत आहे. दलित, पीडित, वंचित, शोषित, मुस्लिम, आदिवासी घटकांचा आवाज होत आहे. त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या विचारांवरच ही संघटना काम करत आहे. यासाठी लढाऊ पँथर्सचं संघटन वाढवत आहे.धनंजय हुंबे यांच्या सामाजिक राजकीय कार्याची दखल घेत ही निवड झाली. महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांनी व उस्मानाबाद जिल्ह्यातील युवकांनी या नियुक्तीच स्वागत केले असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.