तुळजापूर /प्रतिनिधी
येथील उपजिल्हारुग्णालयातील ४२ वर्षिय कोरोनाचा  हायरिस्क मधील व्यक्ती कुणालाही न सांगता निघुन गेल्याची घटना दि18 जुलै 2019 रोजी शनिवारी राञी  नऊ वाजता घडली  सदरील व्यक्ती स सोमवार दि20सकाळी आकरा वाजता  जुन्या बसस्थानक  वरील फुटपाथ येथे ताब्यात घेवुन त्याची रुग्णालयात रवानगी करण्यात आली. सदरील व्यक्तीस सोमवारी सकाळी नऊ वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले माञ 108 रुग्णविहिका  उशीरा आल्याने सदरील व्यक्ती तिथेच झोपुन होता.
या बाबतीत अधिक माहीती अशी की, कोविड 19 रुग्णालयात हायरिस्क असलेल्या ४२ वर्षीय व्यक्ती ने शनिवारी राञी डॉक्टरांची नजर चुकवुन  धुम टोकली होती.  त्यानंतर डा़क्टरांनी तक्रार पोलिस ठाण्यात दिली होती .त्यानंतर तो सोमवार सकाळ पर्यत गायब होता अखेर सोमवारी सकाळी सदरील व्यक्तीची माहीती देणारा फोन पोलिसांना आल्याने घटनास्थळी पोलिस तातडीने  दाखल झाले. दरम्यान सातत्याने  फोन करुन ही 108 रुग्णवाहिका वेळेवर आली नाही सदरील व्यक्ती  तिथेच झोपुन होता  अकरा वाजता  रुग्णवाहिका  आली व रुग्णालयात घेऊन गेली .
धुम ठोकलेला हायरिस्क व्यक्ती  पळुन गेलेल्या व्यक्ती चे स्वँब सोमवार दि.20 रोजी घेतले असुन त्याचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणर असल्याची माहीती उपजिल्हारुग्णालयाने दिली. सदरील व्यक्ती या  कालावधीत कुठे गेला होता कुणाचा संपर्कात आला होता याची माहीती उपलब्ध होवू शकली नाही .

 
Top