छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव राज्यसभा सदनात घेऊ नये हे माझे सदर आहे असे म्हणणाऱ्या भाजपाच्या व्यंकय्या नायडू यांचा निषेध करण्यात आला. त्याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदार यांच्यामार्फत देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गोकुळ तात्या शिंदे, धन्यकुमार पाटील, बबन गावडे, संदीप गंगणे, युवक जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम व कार्यकर्ते उपस्थित होते.