परंडा / प्रतिनिधी :-
दुध उत्पादनाचा खर्च निघत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला असुन दुभती जनावरे विकण्याची वेळ आल्याने दुधाला १० रुपये प्रतिलिटर अनुदान द्यावे अन्यथा आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल असा इशारा स्वाभीमानी संघटणेच्या वतीने निवेदनाद्वारे दिला आहे .
 दि.२१ जुलै रोजी तहसिलदार परंडा मार्फत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्या दुधाचे दर प्रचंड घसल्याने उत्पदनाचा खर्च निघत नसल्याने शेतकरी वर्ग प्रचंड अडचणीत आला आहे शासण शेतकऱ्यांच्या प्रश्ना कडे लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी पसरली असून दुभते जनावरे विकण्याची वेळ आली आहे तरी तत्काळ दुधाला प्रतिलिटर १० रुपये प्रमाणे अनुदान जाहिर करावे अशी मागणी करण्यात आली आहे .
तसेच शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यास  बँक आधिकाऱ्या कडून अडवणुक होत असून वेळेवर पिक कर्ज वाटप होत नाही त्या मुळे शेतकऱ्यांना बॅकेत हेलपाटे मारावे लागत आहे तरी शेतक त्यांची अडवणुक करणाऱ्या बँक आधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.निवेदनावर तालूका अध्यक्ष शंकर घोगरे ,सादत काझी ,रामेश्वर नेटके , भानुदास रंदवे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 
Top