वाशी / प्रतिनिधी-
गावातील  व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी तसेच इतरही नागरीकांना संसर्गाचा धोका कमी व्हावा या उद्देशाने  वाशी तालुक्यातील विजोरा येथील  सार्थक बहुउद्देशीय समाजसेवी संस्था विजोरा तर्फे श्री. बाबुराव साहेबराव साळवे यांच्या सहकार्याने व राजवर्धन सत्यवान मेटे याच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विजोरा गावातील   कुटुंबाना अार्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी औषधाचे घरोघरी    वाशीचे डॉ.अक्षय इंगोले  यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी  सत्यवान मेटे, समाधान मेटे, ऋषिकेश महाडिक, सचिन मेटे, प्रशांत मेटे,निखिल भैरट, बालाजी खोसे,बाबुराव मेटे, तुषार भैरट,आदी उपस्थित होते.
 
Top