कळंब ( शिवप्रसाद बियाणी )
 भाजीपाला विक्रेता मध्ये सोशल डिस्टंसिंग ठेवण्यासाठी ,भाजीपाला व फळ विक्री त्यासाठी शाळेच्या प्रांगणात बाजार भरवावा , न.प.ने कोवीड स्वतंत्र हॉस्पिटल उभे करावे अशी मागणी शिवसेनेचे गटनेते शिवाजी कापसे यांनी केली आहे.
  मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात मोठी गर्दी होत आहे,, शासनाच्या नियमाची पायमल्ली होत असून, न.प प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने , पार्किंग ची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी , शुद्ध पाण्याचे फिल्टर त्वरित चालू करण्यात यावे, सद्या रोगट वातावरण असून यामुळे साथीच्या रोगा चा फैलाव होऊ शकतो त्यामुळे फवारणी करण्यात यावी, प्रत्येक प्रभगातील नाल्या साफ करण्यात याव्यात शहरातील अर्धवट कामे त्वरित पूर्ण करावीत घंटागाड्या चे वेळापत्रक लावण्यात यावेत, ज्या भागात कोरोणा चे रुग्ण सापडत आहेत, तो परिसर फवारणी करून तेथील नागरिकांना न.प. च्या वतीने मास्क, आर्सेनिक अल्बम च्या गोळ्या व गरजवंताला किराणा साहित्य देण्यात यावे.
     कळंब न.प.ने कोरोना रुग्णासाठी स्वतंत्र्य रुग्णालयाची उभारणी करावी अशी मागणी ही करण्यात आली असून , या निवेदनावर शिवसेनेचे गटनेते शिवाजी आप्पा कापसे, नगरसेवक सतीश टोणगे, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. हे निवेदन मुख्याधिकारी देविदास जाधव यांना देण्यात आले.
 
Top