तुळजापूर / प्रतिनिधी-
तुळजापूर शहरासह परिसरात शुक्रवार  पहाटे एकतास  मुसळधार पावसाने झोडपुन काढले नंतर दुपार पासुन रिपरिप स्वरुपाचा पाऊस पडला त्यामुळे शुक्रवार रोजी सर्वाधिक पाऊस तुळजापूर विभागात 55 मिमि इतकी नोंद झाली आहे.
 तुळजापूर तालुक्याची पावसाची सरासरी 804.54 मीमी असुन शुक्रवारी सकाळ पर्यत  258.1 मिमि 33 टक्क्के पाऊस झाला आहे.हा पाऊस खरीप पिकासाठी  पोषक मानला जात आहे. या झालेल्या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणीच पाणी साचले होते दुकाने बंदच असल्याने या पावसात नुकसान झाली नाही .
  तालुकात शुक्रवार झालेला पाऊस 
 तुळजापुर- 65mm (333), मंगरूळ-  32mm(226),  सावरगांव-  24mm(343),  नळदुर्ग -   48mm(271), जळकोट- 
 48mm(236),  सलगरा दि.- 39mm(151),  ईटकळ- 35mm(252) अशा प्रकारे नोंद झाली आहे. 
 
Top