उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी-रूईभर येथे कोरोना बाधित रूग्ण आढळल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी या दोन्ही गावास भेट देऊन प्रतिबंधीत भागातील परिस्थतीचा आढावा
घेवुन नागरिकांना सूचना दिल्या. त्यानंतर नागरिकांशी चर्चा केली. दरम्यान आर्सेनिक अल्बम-30 या रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळ्याचे वाटप करण्यास सुपूर्द करण्यात आल्या. कोरोना कॉरनटाईन केलेल्या व्यक्तींची आरोग्य तपासणी वेळोवेळी करावी. तसेच नागरिकांनी प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी शिवसेना  तालुकाप्रमुख सतिषकुमार सोमाणी,मोईन पठाण, उपतालुका प्रमुख राजनारायण कोळगे, शिवसैनिक राजू परदेशी , अनिल बागल, शाम पाटील,दिनेश हेड्डा, किरण चव्हाण, बाबा गुरव, बाबा वाघूलकर, सुनिल घंटे, सहाय्यक गटविकास अधिकारी मयूर तायडे, नायब तहसिलदार राजाराम केलूरकर, बेंबळी पोलिस स्टेशनचे पुलिस निरीक्षक मुस्तफा शेख, सरपंच सत्तार शेख पत्रकार उपेद्र कटके, वैद्यकीय अधिकारी डॉ.सूर्यवंशी, डॉ.राठोड, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित  होते.

 
Top