उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
शेतकऱ्यांना कर्जासाठी कोणीही वेठीस धरू नये. जर वेठीस धरल्यास माझ्यासी गाठ आहे. या विषयाला माझी सर्वाधिक प्राथमिकता आहे. कोणतीही दिरंगाई करू नये. तसेच जर दिरंगाई झालीच तर शेतकऱ्यांनी थेट माझ्यासी संपर्क करावा, असे आवाहन भाजपाचे आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी  केले.
 ग्रामीण भागात दौऱ्यावर असताना समुद्रवाणी, ता. उस्मानाबाद येथील शेतकऱ्यांनी भेटून महाराष्ट्र ग्रामीण बँकेत पीक कर्जाची प्रकरणे लवकर मार्गी लावली जात नसल्याची तक्रार केली होती. तात्काळ त्याठिकाणी जाऊन तेथील बँक शाखेच्या अधिकाऱ्यांशी बोलून जलद गतीने कर्ज प्रकरणे मार्गी लावण्याबाबत सूचना आ.पाटील यांनी केली
यावेळी भाजप प्र.का.सदस्य श्री.सतीश दंडनाईक, गावातील श्री.युवराज ढोबळे, श्री.लक्ष्मण घुले, श्री.इम्रान मेंडके, श्री.अमोल घुले, श्री.बालाजी मनसुळे, श्री.विश्वनाथ मनसुळे आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.
यावेळी बँकेत कर्मचारी कमी असल्यामुळे दिरंगाई होत असल्याची अडचण अधिकार यांनी सांगितले . सध्याची परिस्थिती आणीबाणीची आहे. सर्वच कर्मचारी जास्तवेळ थांबून काम करत आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांना मदत होण्याच्या दृष्टीकोनातून बँक कर्मचाऱ्यांनी काम करावे व शेतकऱ्यांना अडचण येणार नाही याची दक्षता घेण्याबाबत त्यांना आ.पाटील यांनी केल्या
 
Top