लोहारा/ प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी डॉ.रमाकांत जोशी यांनी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सास्तुरसह लोहारा तालुक्यात आरोग्य क्षेत्रात निस्वार्थ भावनेतून आपल्या जीवाची पर्वा न करता उत्तम आरोग्य सेवा देऊन उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सम्राट ग्रुप लोहारा-उस्मानाबाद यांच्या वतीने श्री. जोशी यांचा मान्यवरांच्या हस्ते कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन सत्कार करून गौरव करण्यात आला.
यावेळी सम्राट ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष उत्तम भालेराव, उपाध्यक्ष कबीर सोनवणे, नंदन थोरात, सचिव किरण चौगुले, कार्याध्यक्ष कृपाल माटे, यांच्यासह आदी, उपस्थित होते.जोशी यांचे लोहारा परिसरातुन सर्वत्र कौतुक होत आहे.

 
Top