तुळजापूर /प्रतिनिधी-
जिल्हा सीमेवरील तपासणी नाक्यांवरील कर्मचारी हलगर्जीपणा करत असून यामुळे सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिक शहरात येत आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असून, जिल्हा सीमेवरील तपासणी नाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावून हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले होते. परंतु अनलॉक नंतर मोठ्या संख्येने परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला आहे. यामुळे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा सीमेवरील तपासणी नाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय बोंदर यांच्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे.