उस्मानाबाद  / प्रतिनिधी-
मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या एच. एस.सी शालांत प्रमाणपत्र परिक्षा मध्ये तालुक्यातील बेंबळी येथील श्री सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शाळा व गावाचे नाव मोठे केले आहे.  या विद्यालयाचा किमान कौशल्याचा निकाल एकुण ८८ टक्के लागला आहे.
 श्री सरस्वती महाविद्यालयातून व केंद्रात प्रथम क्रमांक बोरगांवे आदेश राम (85.53%)याने पटविला आहे. तर   द्वितीय
क्रमांक बेंबळीतील कु. दाणे ज्योती पांडुरंग (82.46%),  तृतीय क्रमांक अनसुर्ड येथील श्री माने प्रदीप नरहरी  (79.38%), चतुर्थ  क्रमांक  कु. लगस पूजा आनंद (79.07%), पाचवा   क्रमांक  अनसुर्ड  येथील आडसुळे प्रतीक  नर्सिंग  (76.46%) याने पटकावून यश प्राप्त केले आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशानंतर प्रियदर्शनी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल गिरवलकर यांनी फोनद्वारे सर्वांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच  संस्थेचे सचिव भाऊसाहेब पाटील, उपाध्यक्ष श्री पांडुरंग व्हन्सनाळे, संचालक मंडळ श्री बलभीम भोजने ,श्री संजय गिरवलकर , श्री प्रकाश शिंदे, प्रशासकीय अधिकारी व मु.अ. श्री सुनिल गिरवलकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील शैक्षणीस वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 घरी जाऊन केला सत्कार
सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक  विद्यालयातील विद्यार्थी बोरगांवे आदेश राम (रा. उमरेगव्हाण) याने केंद्रातून व विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावून मोठे यश प्राप्त केले आहे.  त्याने  प्राप्त केलेल्या यशानंतर शाळेच्या वतीने त्यांच्या घरी जाऊन त्याचा  व पालकांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी उमरेगव्हाण येथील जिल्हा परिषदेचे शिक्षक व विद्यार्थी राजकुमार सपकाळ व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. या आदर्शवत सत्कार समारोह कार्यक्रमाचा उपक्रम शाळेतील  प्राध्यापक व शिक्षक  श्री अशोककुमार पापडे ,श्री मोहन पाटील ,श्री राजेंद्र गोबरे ,श्री विश्वनाथ हजारे ,श्री बंडू फस्के, श्री तानवडे मधुसूदन यांच्या व शाळेच्या वतीने राबविण्यात आला. या उपक्रमाचे ही कौतुक होत आहे.
 
Top