उस्मानाबाद/प्रतिनिधी
जिल्ह्यात मनाई आदेश लागू केलेला असतानाही हॉटेल सुरू ठेवून व्यवसाय करणाऱ्या रत्नापूर फाटा (ता. कळंब) येथील तीन हॉटेल चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास करण्यात आली.
कोरोना रोगाच्या संक्रमणास आळा बसावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने विविध मनाई आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. मनाई आदेशांचे उल्लंघन करु रत्नापुर फाटा येथे बालाजी भगवान बांगर (रा. येरमाळा, ता. कळंब), गोविंद शिवाजी मुंढे (रा. दुधाळवाडी, ता. कळंब), सोमनाथ विठ्ठल नरसाळे (रा. शिराळा, ता. बार्शी) अशा तिघांनी आपापल्या ताब्यातील अनुक्रमे हॉटेल बांगर, हॉटेल मुंढे बंधू, हॉटेल श्रावणी हे हॉटेल्स सुरू ठेवले. तीन हॉटेलात स्वत: हॉटेल मालक व कामगारांना नाका- तोंडास मास्क न लावता, सामाजीक सुरक्षित अंतराचे पालन न करता हॉटेलात कामकाज करत असतांना येरमाळा पोलिसांच्यांया पथकास आढळले. यावरुन पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
Top