लोहाच्या/प्रतिनिधी
मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात कोविड-१९ च्या संकटाच्या पार्श्वभूमीवर रसायनशास्त्र पदवी-पदव्युत्तर विभागाच्या वतीने राष्ट्रीय वेबिनार नॅनो कॅटालॅटिक फ़िक्साशन ऑफ कार्बन डायऑक्साइड इन टू ऑरगॅनिक मॉलेकुल्स : कंट्रोलिंग रीअँक्शन फॉर ग्लोबल वार्मिंग याविषयावर बेंगलोर येथील जैन युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉ. अरविंद जाधव यांचे शनिवारी (ता.११) रोजी आयोजन करण्यात आले. या वेबिनारच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बापूराव पाटील होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.अरविंद जाधव म्हणाले की, वेबिनारच्या माध्यमातून नॅनो कॅटालॅटिकच्या साह्याने वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे रूपांतर उपयुक्त अशा ऑरगॅनिक मॉलेकुल्समध्ये करता येते. हे डॉ.जाधव यांनी आपल्या सादरीकरनातून स्पष्ट केले. याचा फायदा पर्यावरण प्रदूषण कमी होण्यास व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निश्चितच  होईल असे मत त्यांनी मांडले. त्यांचे हे संशोधन पेटंटसाठी दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. समाजव्यवस्थेमध्ये नेहमी वावरताना रसायनशास्त्र विषयाबाबत रसायनाच्या अतिरेकी वापरामुळे पर्यावरणाचे प्रदूषण वाढत आहे पण आजच्या वेबीनारच्या माध्यमातून हे स्पष्ट करण्यात आले की, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रसायनशास्त्र किती महत्वाचे आहे हे त्यांनी सहउदाहरण स्पष्ट केले.
या वेबीनारसाठी आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात,मध्यप्रदेश,राजस्थान, राज्यासह महाराष्ट्र राज्यातील जवळपास १२५ प्राध्यापक, अभ्यासक, संशोधकांनी ऑनलाइनद्वारे सहभाग घेतला. या वेबीनारसाठी ३१५ संशोधकांची ऑनलाईनद्वारे नोंदणी करण्यात आली होती. वेबिनार यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ.अशोक सपाटे, रसायनशास्त्र विभागातील प्रा.डॉ.जयश्री सोमवंशी, प्रा.गोपाळ कुलकर्णी, प्रा.नितांजली राजमाने, प्रा.दयानंद राठोड, डॉ.सतिश शेळके, डॉ.रविंद्र आळंगे आदींनी परिश्रम घेतले तर टेक्निकल नियोजन प्रा.सचिन राजमाने, प्रा.लक्ष्मण पवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.राजकुमार रोहीकर यांनी केले. प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय वेबिनारचे आयोजन सचिव डॉ.आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी करून दिला. सुत्रसंचालन वेबिनारचे संयोजक डॉ.सुशील मठपती तर आभार वेबिनारचे समन्वयक प्रा.सुजित मटकरी यांनी मानल
 
Top