उस्मानाबाद/प्रतिनिधी-
कळंब ते लातूर रस्त्याने कारमधून चोरटी वाहतूक करत नेली जाणारी २४ हजार ९६० रुपयांच्या दारूच्या ४८० बाटल्या स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केल्या आहेत. ही कारवाया सोमवारी सायंकाळी सात वाजता करण्यात आली.
कळंब- लातूर रोडवरील भरत शेळके कॉम्प्लेक्स समोरील रस्त्याने जाणारी कार (क्र. एमएच ४३ ए ७९०२) संशयावरून अडवून तिची तपासणी केली. यात कारमधील अजित शिवाजी तांबडे (रा. उपळाई, ता. कळंब) याने दारुचा विनापरवाना चोरटा विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने कारमध्ये देशी दारुचे १० खोकी त्यात एकूण ४८० बाटल्या नेत होता. यावर पथकाने या देशी दारुसह वाहतुकीस वापरलेली कार जप्त करुन आरोपीस मुद्देमालासह कळंब पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
 
Top