उस्मानाबाद/प्रतिनिधी-
तालुक्यातील महाळंगी येथे घरासमोर उभी केलेली दुचाकी रात्रीच्या दरम्यान चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दशरथ महादेव राउत (रा. महाळंगी, ता. उस्मानाबाद) यांनी त्यांची दुचाकी (क्र. एमएच २५, एए ४०१३) आपल्या राहत्या घरा समोर लावली होती. ती त्यांना दुसऱ्या दिवशी लावल्या जागी आढळुन आली नाही. यावरुन दुचाकी चोरुन नेली असल्याचे आढळून आले. दशरथ राऊत यांच्या फिर्यादीवरुन चोरट्याच्या विरोधात बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 
Top