उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 विविध गुन्ह्यात पाहिजे- फरारी असलेल्या आरोपींच्या शोधार्थ मा. पोलीस अधीक्षक श्री. राजतिलक रौशन यांनी मोहिम सुरु केली आहे. वाशी पो.ठा. गु.र. क्र. 83/2018 या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी मुकेश दत्तु शिंदे, वय 25 वर्षे रा. पारधी पिढी, पिंपळगांव (क.), ता. वाशी यास स्था.गु.शा. च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे  दि. 06.07.2020 रोजी ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी पो.ठा. वाशी च्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि. श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, तानाजी माळी, पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे, संताष गव्हाणे यांच्या पथकाने केली आहे.
 
Top