लोहारा /प्रतिनिधी-
कोविड- 19 रोगाच्या संक्रमनास आळा बसावा यासाठी मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने विनापरवाना प्रवेशास जिल्ह्याच्या सर्व सिमा बंद आहेत. असे असतांनाही 1)सिकंदर मोहंमद पटेल, रा. हात्तुर, ता. सोलापूर (द.) 2)जयमराम सुर्यकांत पवार, रा. गुंजेगाव, ता. सोलापूर (द.) या दोघांनी दि. 05.07.2020 रोजी 10.00 वा.सु. पोलीस नाकाबंदीस टाळून छुप्या मार्गाने लोहारा शहरात प्रवेश केला. या कृतीमुळे कोविड- 19 चा संसर्ग होण्याची जाणीव असतानाही त्या दोघांनी असे निष्काळजीपणाचे कृत्य केले.
यावरुन नगरपंचायत कर्मचारी- कमलाकर मुळे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन त्या दोघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 269, 34 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये गुन्हा दि. 05.07.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
 
Top