उस्मानाबाद/प्रतिनिधी 
उस्मानाबाद नगरपालिकेच्या प्रांगणात शहीद जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेल्या स्मृती स्तंभास दि.२६ जुलै रोजी कारगिल विजय दिनानिमित्त पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करत हा दिवस साजरा करण्यात आला.
उस्मानाबाद नगरपालिकेच्या प्रांगणात शहीद जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मृतिस्तंभ उभारण्यात आलेला आहे. या ठिकाणी अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा सैनिक कल्याण विभागाचे कप्तान जे. एस. मेहता, उस्मानाबाद नगरपालिकेचे मुख्याधिकारी हरीकल्याण येल्लगुट्टे, कार्यालयीन अधीक्षक संजय कुलकर्णी, अग्निशमन विभागाचे अधिकारी हेमंत कारले आदी मान्यवरांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

 
Top