उस्मानाबाद/प्रतिनिधी-
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद येथे ब्रिटानिया इडस्ट्रीज लि., रांजणगाव जि पूणे यांचे अधिकारी कॅम्पस मुलाखतीकरीता उपस्थित होते. मुलाखतीकरीता ग्रामिण भागामधून एकूण 41 प्रशिक्षणार्थ्यांपैकी 18 प्रशिक्षणार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली.
 ही मुलाखत पार पाडताना मा. जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी देण्यात आलेल्या लॉकडाउनच्या नियमांचे पालन करण्यात आले. सदर कार्यक्रमाकरीता औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मा. प्राचार्य श्री. रविशंकर सावळे, व मा. सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार श्री. सुर्यवंशी एस. व्ही यांचे मार्गदर्शन लाभले. ब्रिटानिया इंडस्ट्रिज लि. चे प्रतिनिधी श्री. अभिषेक मिसाळ, श्री फैरो जमाल व इतर अधिकारी उपस्थित होते. तसेच श्री. महाडीक एम.जी., श्री. राउत एस. टी. श्री. भोकरे पी.जी. व श्री. पाटील आर. आर. यांचे सहकार्य लाभले
 
Top