उस्मानाबाद/प्रतिनिधी-
१ जुलै म्हणजे डाॅक्टर दिन जिवाची पर्वा न करता कोरोना व्हायरसच्या संकटसमयी लढाई करत असलेले “रियल हिरो”आपल्या आरोग्याची काळजी घेणारे डाॅक्टर यांचा कर्तव्यावर असताना आज मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या वतीने जिल्हा शासकीय रूग्णालयात येथे जिल्हा शल्यचिकित्सक राजाभाऊ गलांडे , जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ वडगावे साहेब तसेच सर्व डाॅक्टर यांचा  पुष्पगुच्छ, गुलाबाचे फुले देऊन सत्कार व शुभेच्छा देण्यात आल्या.
 या वेळी  विद्यार्थी सेनेचे सौरभ देशमुख,दादा देशमुख,अक्षय खडके, शुभम खडके,विशाल सूर्यवंशी आकाश सूर्यवंशी ,अमर विळेगावे,साजिद तांबोळी आदी उपस्थित होते. 
 
Top