उस्मानाबाद/ प्रतिनिधी -
उमरगा मध्ये पाच व परंड्यात दोन तर उस्मानाबादेत एक असे एकूण आठ नवे कोरोबाधित रुग्ण आढळले   जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 220 झाली असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे.जिल्हा रुग्णालयाला हा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला. जिल्हा रुग्णालयाच्यावतीने उमरग्यातून 23 जणांचे स्वॅब तपासणीसाठी लातूर पाठविणयत आले होते त्यातील पाच जण पांझिटिव्ह आढळले. तर 18 जण निगेटिव्ह आहेत. 
उस्मानाबादेतून 27 जणांचे स्वॅब तपासणीसाठी लातूर पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज आला असून एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. परंडा तालुक्यातून 16 जणांचे स्वॅब तपासणीसाठ पाठविण्यात आले. त्यातील दोघे जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तुळजापूरातून पाठविण्यात आलेल्या 35 जणांच्या स्वॅब पैकी सर्व जण निगेटिव्ह आहेत. लोहार्‍यातून पाठविण्यात आलेल्या 5 जणांच्या स्वॅब पैकी सर्व जण निगेटिव्ह आहेत.जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता 220 वर पोहंचली आहे. जिल्ह्यातून आतापर्यंत 3 हजार 129 जणांचे स्वॅब तपासणीसाठी लातूर येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी 220 जण कोरोबाधित आढळले असून 2 हजार 623 निगेटिव्ह आहेत. 175 जणांचा अहवाल प्रलंबीत असून 38 जणांचा स्वॅब नाकारण्यात आला आहे. तर 89 जण इनक्न्लुजीव आहेत. जिल्ह्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 8 रुग्ण उस्मानाबादेतील एक रुग्ण तुळजापूरतील दोन रुग्ण उमरग्यातील आहेत.
 
Top