उस्मानाबाद / प्रतिनिधी-
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा, विद्यापीठ. सल्गनित,येथील रामकृष्ण परमहंस  महाविद्यालयातील बी.ए/बी.काॅम/बी.एस्सी. या पदवी वर्गाची ऑनलाईन प्रवेशासाठीची  नोंदनी प्रक्रिया सूरू झालेली आहे.तरी उस्मानाबाद शहर व परिसरातील ज्या विद्यार्थ्यांना रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा आहे आशा विद्यार्थ्यांनी आँनलाईन प्रवेशासाठीची नोंदनी
http://bamuaoa.digitaluniversity.as/ या वेबसाईटवरून करावी व नोंदनी संबंधातील माहिती दिलेल्या वेबसाईटवरून घ्यावी. असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी केले आहे.या संबंधित सूचना महाविद्यालयाच्या काच फलकात लावलेली आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सूचना वाचव्यात व वेबसाईटवरून प्रवेश नोंदनी करावी.
 
Top