उस्मानाबाद / गोविंद पाटील
तालुक्यातील सर्वात मोठे  गाव म्हणून बेंबळी गावास ओळखले जाते. या गावात प्रत्येक  आठवड्याच्या  सोमवारी आठवडी बाजार भरतो. याठिकाणी परिसरातील सतरा ते अठरा गावातील भाजीविक्रेते, शेतकरी व व्यापारी बाजारासाठी येतात. सध्याच्या कोरोणाच्या कठीण प्रसंगी सर्वत्र आठवडी बाजार ,धार्मिक क्षेत्रे, यात्रा -जत्रा बंद आहेत. परंतु बेंबळी येथे मागील अडीच महिन्यांपासून आठवडी बाजार पोलिस व ग्रामपंचायतीच्या निगराणीखाली भरवला जात आहे. त्यामुळे गावातील नागरिकांची सोय झाली आहे. तसेच परिसरातील नागरिकांचे ही मोठी सोय झाली आहे .
 मागील चार दिवसापूर्वी येथे बेंबळी व रुईभर गावात प्रत्येकी एक कोरोना बाधित रुग्ण आढळला त्यामुळे कोरोणा बाधित रुग्णांच्या रहिवास परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून उपविभागीय अधिकारी यांनी जाहीर केला. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतच्या वतीने आयुष काढा , मास्क वापराबरोबर थरमल स्कॅंनर व ऑक्सीमीटरने नागरिकांची तपासणी करण्यात आली. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी सकाळी सात ते दुपारी 12 पर्यंत आठवडी बाजार भरविण्यात आला होता. गावामध्ये प्रतिबंधित क्षेत्र असतानाही नागरिकांनी व भाजी विक्रीत्यांनी आठवडी बाजार भरविला होता. बाजारामध्ये भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना तोंडाला मास्क बांधा असे आवाहन पोलिसांच्या वतीने व पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांच्यावतीने करण्यात येत होते तरी तरीही काही नागरिक उपाययोजना संबंधित नियमांचे पालन करताना दिसून येत नव्हते त्यामुळे हा आठवडी बाजार सोयीसाठी की गैरसोई साठी असा प्रश्न यंत्रणेसमोर उभा ठाकला आहे.
 
Top