उस्मानाबाद  / प्रतिनिधी-
शेतकऱ्यांच्या दुधाला लिटरमागे दहा रुपये वाढ करून दूध पावडर आयात रद्द करावी, प्रति किलो दूध पावडरला ५० रुपये अनुदान द्या, अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करून ग्रामीण भागातील दूध शहरात येऊ दिले जाणार नसल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
कोरोना संकटात अनेक निर्बंधामुळे दुधाची मागणी कमी झाली असून शेतकऱ्यांना अल्प दर मिळत आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याने दुधाला लिटरमागे दहा रुपये वाढ करण्यात यावी. तसेच दुधाच्या अनुदानावरील जीएसटी रद्द करावी, दूध पावडर आयात रद्द करावी, प्रति किलो दूध पडला ५० रुपये अनुदान देण्यात यावे, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.२३) देण्यात आले. भाववाढ न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, येत्या सहा ऑगस्टपासून “दूध बंदी’ करण्यात येईल, तसेच ग्रामीण भागातील दूध शहरात येऊ दिले जाणार नाही. शहराच्या वेशीवरच दुधाच्या गाड्या आवडल्या जातील, याची नोंद प्रशासनाने घ्यावी, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा सचिव दादा कांबळे, मिलिंद चांडगे, शहराध्यक्ष संजय पवार, सरपंच मुरली देशमुख, विद्यार्थी सेनेचे सौरभ देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top