उस्मानाबाद  / प्रतिनिधी-
एका १७ वर्षीय अल्पवयीन बालकावर गावातीलच सहा जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना दि.२४ मार्च ते २२ जुलै दरम्यान जिल्ह्यातील एका गावात घडली असून याप्रकरणी आरोपी गावातीलच सहा तरुणांविरोधात संबधित पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित बालकाने दिलेल्या तक्रारीत आरोपींनी वरील कालावधीत वेळोवेळी धमकाऊन अत्याचार केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार अाराेपींवर भा.दं.सं. कलम- ३७७, ५०६, ३४ सह बाललैंगीक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम-४, ६, १२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
 
Top