उस्मानाबाद /प्रतिनिधी -
मौजे ईर्ला ता.उस्मानाबाद येथे दोन कोरोना रुग्ण आढळले असून त्यामुळे ईर्ला हे गाव प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. अत्यावश्यक सुविध वगळता तेथील सर्व व्यवहार ठप्प आहेत. सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही बाब योग्य आहेच परंतु ईर्ला येथे संबंधीत तलाठी सज्जाचे मुख्य कार्यालय असल्याने शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या 7/12,8अ, पिकपेरा, फेरफार नक्कल आदी. कागदपत्रे मिळणे अवघड झाले आहे. पिकविमा भरण्यासाठी तसेच पिककर्ज प्रकरणे करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक असून त्यांची पुर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांकडे कमी कालावधी राहीलेला आहे.
संबधीत तलाठी सज्जाचा कारभार पुर्वीपासून ईर्ला येथूनच चालतो. तेव्हा शेतकऱ्यांची होणारी गैरसोय व होणारे नुकसान लक्षात घेता ईर्ला येथील तलाठी सज्जाची पर्यायी व्यवस्था इतर एखाद्या ठिकाणी तात्काळ करण्यात यावी अशी मागणी युवासेनेचे जिल्हा समन्वयक अॅड.संजय भोरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.निवेदनावर अॅड.संजय भोरे यांच्यासह युवासेनेचे तालुका सहसंघटक व्यंकटेश कोळी,तुळजापुर विधानसभा समन्वयक तानाजी आगळे, विधानसभा उपप्रमुख अमोल जाधव आदींच्या सह्या आहेत.