तुळजापूर /प्रतिनिधी -
सोलापूर जिल्हा हद्दीवर बंदोबस्त वाढविण्याची सुचना आ. राणाजगजितसिंहपाटील यांनी अधिकारी वर्गाना केली.तुळजापूर येथील धोत्री या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती मिळाल्यावर या भागात भेट देऊन पाहणी केल्यानंतर आ.राणाजगजितसिंह पाटील बोलत होते.
धोत्री गावातील पॉझिटिव्ह आलेला व्यक्ती हा भाजीपाला विक्रीसाठी पुणे येथे ये-जा करत होता. अशी माहिती नागरिकांशी केलेल्या चर्चेतून मिळाली आहे. पुण्यातील भाजीपाला व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे या रुग्णाने स्वतःहून कॉरंटाईन केले. त्याची तपासणी केली असता तो देखील पॉझिटिव्ह आढळला .
रुग्णाच्या घराजवळील परिसर सील करण्यात आला आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १८ जणांना कॉरंटाईन करण्यात आले आहे.धोत्री व परिसरातील गावे हे सोलापूर जिल्हा हद्दी जवळ आहेत. त्यामुळे या गावातील नागरिकांचा सोलापूरशी संपर्क होत आहे. म्हणूनच जिल्हा हद्दीवर बंदोबस्त वाढवण्यात यावा याबाबत देखील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. तसेच संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण गाव सॅनिटाइझ करण्याचा सूचना केल्या आहेत.
त्याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती अस्मिताताई कांबळे, गटविकास अधिकारी श्री.प्रतापसिंह मरोड, जि.प.सदस्य श्री.राजकुमार पाटील, पोलीस पाटील, श्री.दत्ता पाटील, श्री.अप्पा रवळे, श्री.श्रीकांत पाटील, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य विभागाचे कर्मचारी आदींची उपस्थिती होती.
 
Top