उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला. मुख्यमंत्री व खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवानिमित्त निर्धार सप्ताहाची सांगता रक्तदान शिबिराने झाली.या रक्तदान शिबीरात १६४ शिवसैनिकांनी रक्तदान केले.अशी माहिती तालुका प्रमुख सतीश सोमाणी यांनी दिली.
आमदार कैलास पाटील व तालुकाध्यक्ष सतीश सोमाणी यांनीही रक्तदान केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तेर ग्रामपंचायत कार्यालयास मुख्यमंत्र्यांचा फोटो भेट देण्यात आला. यावेळी ग्रामसेवक नलावडे, सरपंच नवनाथ नाईकवाडी, विभागप्रमुख अनंत भक्ते, अविनाश इंगळे उपस्थित होते. कोरोनामुळे तेर ग्रामस्थांची थर्मामीटर व ऑक्सिमीटरने तपासणी करण्यात आली. तेर येथील स्मशानभूमीत स्वच्छता करून वृक्षारोपण करण्यात आले. लोकसभा मतदारसंघातील सर्व नगरपरिषदेतील महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना साडी-चोळी व मास्कचे वाटप करण्यात आले. उस्मानाबाद, उमरगा, वाशी, तुळजापूर तालुक्यात निर्धार सप्ताहात जन्मलेल्या मुला-मुलींसह मातांना साडी-चोळी व ड्रेस देण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि.२७) १६४ शिवसैनिकांनी रक्तदान केले. कार्यक्रमास पदाधिकारी, शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते. 
 
Top