उमरगा/ प्रतिनिधी-
वाचनामुळेच स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता वाढते, माणूस घडतो. समाजामध्ये वाचनसंस्कृती वाढावी व ती जोपासणे महत्त्वाचे आहे. मी जे काही घडले व मला पुस्तकांनीच उभारी दिली, त्या पुस्तकानीच मला यशस्वी बनवले आणी पुस्तके मला माझ्या नाररंगवाडी गावातील लोकमान्य टिळक वाचालयानी उपलब्ध करुन दिले व मला या यशाच्या शिखरावर पोहचवल्याचे नूतन सहाय्यक विक्रीकर डाॅ. भागीरथी पवार यांनी सांगितले.
उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथिल लोकमान्य टिळक वाचनालयात नुकत्याच महाराष्ट्र लोक सेवा आयोगा परिक्षेत यश मिळविलेल्या गुणवंतांच्या सत्काराला उत्तर देताना त्यानी आपल्या भावना व्यक्त केल्या. या वेळी लोकमान्य टिळक वाचनालयाच्या वतीने वाचनालयाचे अध्यक्ष लिंबराज सोमवंशी यांच्या हस्ते डाॅ.भागीरथी पवारचा छोटे खानी कार्यक्रमाद्वारे सत्कार करण्यात आला होता त्यावे त्यांनी आपल्या भावाना व्यक्त केल्या. या वेळी सचिव विद्याधर सांगवे,भारत शिक्षण संस्थेचे सदस्य शेषेराव पवार,मेजर पप्पु सुर्यवंशी,सोमनाथ माळी,वाचनालयाच्या ग्रंथपाल कमलताई सोमवंशी,विठ्ठल चिकुंद्रे,मिनाताई मुगळे,बालाजी मुळे,भरत मुगळे उपस्थित होते.
या वेळी डॉ. भागीरथी पवारने यानी सांगितले की, सध्याच्या डिजिटल युगात ही वाचना ने माणसाची कशी भरभराट होते हे लोकमान्य टिळक वाचनालय नारंगवाडीने दाखवून दिले आहे.त्या मुळे वाचनालये व वाचन संस्कृती टिकविणे वाढविणे व “वाचाल तर वाचाल” ही काळाची गरज आहे हे अधोरेखित केल्याचे सांगून वेळोवेळी मला या वाचनालयाची दारे खुली करुन मला यशाच्या शिखरा वर पोहचविल्याचे ही डाॅ. भागीरथी पवार म्हाणाल्या त्या मुळे ग्रथालये हे लोकविद्यापिठच आहे या कडे लक्ष देण्याची गरज आहे व  ग्रथालयातील  ग्रंथपालाला अन्य शैक्षणिक कर्मचाऱ्यांप्रमाणेच आदर द्यायला हवा. एकीकडे आपण विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रणालीकडे वाटचाल करीत असताना ग्रंथालयांचा चेहरा मोहराही आनंददायी ठरायला हवा. निराशाग्रस्त शांतते ऐवजी उत्साही वातावरणनिर्मिती तयार करण्यासाठी ग्रथालये कार्यरत आहेत ग्रंथालये हे वर्धिष्णू सातत्याने वृद्धिंगत होत जाणारा घटक असल्याने तितक्‍याच गांभीर्याने लक्ष देण्यासाठी शासनाने ही पुढाकार घेण्याची गरज असल्याचे डॉ. भागीरथी पवार यांनी सांगितले.
 
Top