तुळजापूर / प्रतिनिधी-
मान्सुन आगमणाचा हवामान खात्याने जाहीर केलेल्या खोट्या हवामान अंदाजामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे अर्थिक नुकसान होवुन शारीरिक मानसिक ञास   झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी तातडीने पाच लाख रुपये देण्याची मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष यांनी स्वता निवेदनाद्वारे तहसिलदार व कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहेकी हवामान खात्याने यंदा प्रदूषण नसल्याने पाऊस पडेल असे जाहीर केल्याने शेतकऱ्यांनी उसनवारी करुन  कर्जकाढुन शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली माञ पावसाने ओढ दिली व बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
तरी या नुकसानीस हवामान खात्यातील जबाबदार व दोषी अधिकाऱ्यांनवर हवामान अंदाजाची खोटी हवामानची माहीती देऊन फसवणूक करणे, जीवनाश्यक व अन्नधान्य व शेती नुकसान करुन राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणे व परदेशी शक्तींना मदत करणे या बाबतीत ताबडतोब राष्ट्रद्रोह ,शेतकरी आत्महत्यास फसवणूक करणे या बाबतीत मनुष्य वधाचा सदोष गुन्हा दाखल करुन  नुकसान रक्कम व त्यांच्या पगार व संपत्ती जप्त करावी तसेच हवामान खात्यातील यापुर्वीच्या सर्व दोषी अधिकाऱ्यांची पेन्शन बंद करुन आधी दिलेली पेन्शन व पगार आदी लाभ सरकारी तिजोरीत पुन्हा जमा करुन घेऊन उत्पन्ना पेक्षा अधिक संपत्तीची चौकशी करावी, सदरील नुकसान भरपाई पंधरा दिवसाच्या आत जमा करण्यास आरंभ करावा,  या पुढे शेतकऱ्यांचे कुठलेही अर्थिक नुकसान झाल्यास त्यासाठी केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंञालय हवामान खाते येथील अधिकाऱ्यांना व राज्य सरकारला जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी केली आहे सदरील तक्रारी राष्ट्रपती पंधप्रधान मुख्यमंत्री हवामान खात्याचे प्रमुख अधिकारी अशा सतरा जणांना जिल्हाध्यक्ष रविद्र इंगळे , धनाजी पेंदे,  मनोहर आडेकर अदिंनी सोशल डिस्टंन्स पाळुन दिले
 
Top