तुळजापूर/ प्रतिनिधी -
कृषी  संजीवनी सप्ताह अंतर्गत खंडाळा (ता तुळजापूर ) येथे बीज प्रकिया प्रात्यक्षिक व बीबीई यंञावर सोयाबीन पेरणी करणे व पोखरा योजना  कै. गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजना व कृषी आराखडा   यावर  मार्गदर्शन बुधवार दि.1 रोजी करण्यात आले . या कृषी सप्ताह कार्यक्रमास प्रतिसाद ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
यावेळी कृषी अधिकारी एन.टी. गायकवाड, सचिन सुरवसे,अपेक्षा कसबे, कृषी सहाय्यक आलमले , व्ही.डी. लोंढे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच भिमराव लोखंडे, उपसरपंच हणमत धुमाळ,  संजय पवार , कृषीताई सुवर्णा कांबळे, दत्ता पवार,  संतोष काकडे सह ग्रामस्थ उपस्थितीत होते.
 
Top