लातूर/ प्रतिनिधी
लातूर येथील श्री विठ्ठलराव भवानराव करडिले खुर्दळीकर यांचे स्वगृही वृधापकालाने सोमवार दि. 27 जुलै 2020 रोजी दुपारी 2 वाजता दुःखद निधन झाले आहे. निधन समयी त्यांचे वय 85 वर्षांचे होते. विठ्ठलराव करडिले हे डाॅ अमित करडिले यांचे वडील आणि अॅड पंडितराव करडिले यांचे ज्येष्ठ बंधू होत.
विठ्ठलराव करडिले हे मूळचे मौजे खुर्दळी ता. चाकूर जि. लातूर येथील मूळ रहिवासी असून ते मागील पाच दशकांपासून भाग्यनगर जुना औसा रोड लातूर येथे वास्तव्यास होते.अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेतील शिक्षण संपल्या संपल्या ग्रामसेवक म्हणून नोकरीला लागले. शेवटी जि. प. लातूर कार्यालयातून 1994 ला  उच्च पदावरून सेवानिवृत्त झाले होते. तद्नंतर ते रिकामे न बसता 1995 पासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये  स्वतःचे आडत दुकान सुरू करून 2012 पर्यंत अत्यंत नेकिने व सचोटीने आडत व्यवसाय केले. विठ्ठलराव करडिले हे एक प्रेमळ, सहकार्यशील, प्रामाणिक एक सज्जन माणूस म्हणून सर्वाना आदरणीय व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनिची वार्ता कळताच खुर्दळी आणि भाग्यनगर परिसरावर शोक कळा पसरली आहे. विठ्ठलराव करडिले यांचे मंगळवार दि.28 जुलै 2020 रोजी सकाळी 10 वाजता लातूर येथील खाडगाव स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी,भाऊ,बहिणी एक मुलगा,पुतणे, सूना ,   मुली, जावई ,नातवंडे असा मोठा परिवार आहे. उस्मानाबाद येथील ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य यांचे मामा होते
 
Top