उमरगा/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील एका व तुरोरी येथील एका जेष्ठ नागरिकाचा बुधवारी (दि. १५) येथील रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान बुधवारी सकाळी आणखी चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. उमरगा तालुक्यात यापूर्वी कोरोनामुळे चौघांचा मृत्यू झाला होता. आता बुधवारी एका दिवसात दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६ झाली आहे. तर आत्तापर्यंत एकूण बाधितांची संख्या ९२ झाली आहे.
उमरगा शहर व तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. प्रशासनाकडून उपाययोजना व जनजागृती सुरु असली तरी नागरिकांनीही स्वतःहुन काळजी घेतली पाहिजे. बुधवारी दोन जेष्ठ नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, त्यांच्या पार्थिवावर कोविड पध्दतीने अंत्यविधी करण्याची सूचना देण्यात आली आहेत. उमरगा शहरातील सहा तर तुरोरी व गुंजोटी प्रत्येकी एक असे आठ जणांचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला होता. त्यात गुंजोटी व तुरोरी येथील जेष्ठांचा समावेश होता. गुंजोटीच्या जेष्ठ नागरिकाला उपचारासाठी सोलापूरला नेण्यात आले होते. मात्र बुधवारी पहाटे परत उमरगा येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी दहाच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर तुरोरी येथील एका जेष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या दोघावर कोविड नियमावली अंतर्गत अंत्यसंस्कार करण्यात आले. २७ जुनपूर्वी सतरा पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले होते. त्यात बेडग्याच्या एका जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता. २७ जूनपासुन मात्र बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. १९ दिवसात ती ७५ झाली आहे. त्यात यापूर्वी बलसूर, एकोंडी (ज. ) व बेडगा येथील तीन जेष्ठांसह उमरगा शहरातील जेष्ठ नागरिक असलेल्या औषध विक्रेत्यांचा मृत्यू झाला होता. आता बुधवारी एका दिवसात दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६ झाली आहे. बुधवारी तालुक्यातील चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात सोलापूर येथे खाजगी रुग्णालयात शहरातील माजी नगरसेविकेवर उपचार सुरु आहेत. तर एका व्यक्तीवर लातूर येथे उपचार सुरु आहेत. अन्य दोघांत शहरातील एकोंडीरोड परिसरातील एक व्यक्ति तर एका महिला कर्नाटकातील आहे.
आत्तापर्यंत एकूण बाधितांची संख्या ९२ झाली आहे. दरम्यान माजी नगराध्यक्षाच्या पत्नी तथा माजी नगरसेविकेचा सोलापूर येथून अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बुधवारी स्वतः माजी नगराध्यक्ष यांनी कुटुंबासह स्वॅब घेण्यासाठी कोविड रुग्णालयात दाखल झाले आहेत.