उस्मानाबाद /प्रतिनिधी
उस्मानाबाद पाटबंधारे मंडळ, उस्मानाबाद अधिनस्त कृष्णा मराठवाडा बांधकाम विभाग क्र.1, उस्मानाबाद यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान 2020अंतर्गत तेरणा पब्लीक स्कुल, उस्मानाबाद येथे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उस्मानाबाद पाटबंधारे मंडळ, उस्मानाबाद चे अधीक्षक अभियंता इंजि.सुदर्शन पगार तसेच कृष्णा मराठवाडा बांधकाम विभाग क्र.1, उस्मानाबाद चे कार्यकारी अभियंता इंजि.कृष्णा घुगे यांचे शुभहस्ते शाळेच्या परिसरात वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला.
दरवर्षी जलसंपदा विभागाचा वृक्ष लागवडीसाठी सक्रिय सहभाग असतो. तसेच विभागातर्फे लागवड केलेल्या वृक्षांची जोपासना केली जाते. सदर शाळेचा परिसर डोंगराळ असुन निसर्गरम्य आहे. त्याठिकाणी वृक्ष लागवडीसाठी मोठा वाव असल्याचे इंजि. सुदर्शन पगार यांनी सांगुन शाळेच्या वृक्षप्रेमाचेही कौतुक केले. तसेच शाळेच्या परिसरातील वृक्ष लागवडीसाठी विभागाच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल अशी ग्वाही इंजि.कृष्णा घुगे यांनी दिली. याप्रसंगी सामाजिक वनिकरण विभागाचे श्री ए व्ही बेडके, विभागीय वन अधिकारी व श्री डी एस गांधले, वनक्षेत्रपाल यांनी वृक्षलागडीच्या तांत्रिक पध्दती विषयी विवेचन केले. या परिसरात एकुण 6000 वृक्षांची लागवड विभागामार्फत करण्यात आली असुन भविष्यात वृक्ष जोपासण्याची जबाबदारी शाळा स्विकारत असल्याची ग्वाही संस्थेचे सचिव इंजि. अनंत उंबरे यांनी दिली. उपरोक्त वृक्ष लागवडीस श्री रोहित पडवळ, अध्यक्ष स्व.दिनकर लिबराज पडवळ बहुउद्देशीय सामाजिक संस्था, उपळे(मा.) यांनी जागा उपलब्ध करून दिली. याप्रसंगी जलसंपदा विभागाचे व शाळेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ज्या बोधीवृक्षाखाली सिध्दार्थ गौतमाला बोधी प्राप्त झाली त्या बोधगया येथील ज्या वृक्षाखाली त्यांनी ध्यान केले त्या झाडाचे एक रोप सम्राट अशोकाच्या एका दुताने श्रीलंकेत नेले आणि अनुराधापुर या शहरात लावले. त्याचाच वंशावळ हा बोधीवृक्ष श्रीलंकेतील पवित्र वृक्षाच्या रोपापासुन उगवला असल्याची माहिती इंजि.प्रदिप कांबळे, उपविभागीय अधिकारी, कृष्णा मराठवाडा बांधकाम उपविभाग क्र.4, उस्मानाबाद यांनी दिली व त्या ऐतिहासिक वृक्षाच्या रोपाची लागवड इंजि.कृष्णा घुगे यांच्या हस्ते नळदुर्ग बॅरेज क्र.1 ता. तुळजापूर या कार्यक्षेत्रावर करण्यात आली.
तसेच टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर येथे इंजि. कृष्णा घुगे यांच्या हस्ते केशर आंब्याची लागवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे प्रा.आप्पा बिराजदार, इंजि.सतिश पाटील, श्री भंगाळे तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सदर सर्व वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात सामाजिक अंतर राखुन व सॅनिटायझरचा वापर करून कोरोनाबाबत आवश्यकती सर्व काळजी घेण्यात येऊन सर्व कार्मक्रम पार पाडण्यात आले.